इकॉलॉजी हा एक असा विषय आहे ज्यात प्रत्येक क्षणी काही ना काही आश्चर्यचकित करणारं मिळत जातं. पहिल्या एका वर्षातील कठीण आणि नियमबद्ध कोर्सवर्क ने उत्साहाचा पूर्ण भंकस केलेला. आताही होतं कधीकधी असं, जेव्हा मनासारखं काही करायला मिळत नाही. पण त्या पहिल्या वर्षातली चिडचिड, अनुत्साह, सेल्फ-पिटी, असंतोष आता मात्र मनाला शिवत नाही. साचेबद्ध रिसर्चचा मात्र धसका घेतलाय. सीनियर ने रिसर्चचा अर्थ जेव्हा 'रि' आणि 'सर्च' असा संधीवियोग करून सांगितला तेव्हा त्याला एक थोबाडीत द्यावी असं वाटलं.
एनीवे, आता आता जाणवायला लागलंय की माझ्यात काही पोटेंशियल आहे. इथलं वातावरण आणि माझा बॉस दोन्ही फॅक्टर्स यासाठी कारणीभूत आहेत.
असं जाणवायला लागलंय की माझ्यात काही शक्ती आणि सामर्थ्य आहे. मला हे टॅप करायचंय. I want to flourish.
Thursday, April 27, 2006
Wednesday, April 26, 2006
जे अस्तित्वात नाहीय, त्याचाच शोध चाललेला असतो. जीवनाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता कळायला लागलंय की गहन प्रश्नांची उत्तरे मिळवणे, इतकाच जीवनाचा अर्थ सीमित नाही. एनीवे, पडलेल्या प्रश्नांची उत्तरं बऱ्याचदा मिळवावी लागत नाहीत, ती आपोआप मिळत जातात. अस्तित्व, जीवन, आयडेन्टिटी, आणि असेच निगडित प्रश्न, यांची उत्तरं काही एका फॉर्म्युल्यात बांधता येणार नाहीत. पण तसंच काही असतं तर मात्र मजा आली असती.
Tuesday, April 25, 2006
Saturday, April 22, 2006
पलायनवादी व्यक्ती दयनीय असते, नाही? अशी व्यक्ति बहुतेक कधी हतोत्साहित किंवा निराश होत नसेल; अशा व्यक्तिचा स्वप्नभंग पण कदाचितच होत असणार. पण मागे वळून पाहताना - आणि मग कोणिही का असेना, कधी ना कधी आपल्या जीवनाचे विश्लेषण प्रत्येक मनुष्य करतोच - असं वाटेल, "अरे, काय केलंस या जीवनाचं? संधी मिळाली पण ती घालवलीस...प्रतिभा होती, पण अपयशाच्या भीतीने तिला आत कोंडून ठेवलंस...स्वतःला एका गुफेत कोंडून घेतलंस, कारण प्रतिसाद मिळेल काय आणि मिळाल्यास तो कसा असेल असाच नेहमी विचार करत गेलास...आणि आता उरलंय ते काय? हीच निश्चितता की तू जीवन वाया घालवलंयस".
अशी व्यक्ति दयनीयच असणार. कारण हा सगळा बोध होइस्तोवर ती संधी, ती प्रतिभा, आणि ते मंतरलेले क्षण, सगळं काही अदॄश्य झालेलं असणार.
अशी व्यक्ति दयनीयच असणार. कारण हा सगळा बोध होइस्तोवर ती संधी, ती प्रतिभा, आणि ते मंतरलेले क्षण, सगळं काही अदॄश्य झालेलं असणार.
Thursday, April 20, 2006
Wednesday, April 19, 2006
Monday, April 17, 2006
In Search of Peace
एका मित्राशी जामा मशिदीत झालेल्या बॉम्ब्स्फोटांबद्दल बोलत होतो. मग बॅंगलोर मधला नुकताच झालेला हिंसाचार, बॉम्बे मध्ये झालेले स्फोट, कारगिलचे युद्ध, चीनचे तिबेट आणि काश्मिर वरचे अतिक्रमण, अमेरिकेचा मिड्ल ईस्ट द्वेष अशा बऱ्यच विषयांमधून भरकटत गाडी आली पाकिस्तान मुद्द्यावर. मग मात्र आतापर्यंत मस्त चाललेल्या डिस्कशन मध्ये माझ्या बाजूने एक वेयरिनेस आला. लवकर या डिस्कशन मधनं डिसकनेक्ट होता येत नाही. आणि आग्रह हा असतो की सर्वांचा सहभाग या डिस्कशन मध्ये असावा. जॉन मेनार्ड स्मिथ च्या 'थियरी ऑफ इवॉल्युशन' ची इतकी पारायणं करूनही एक प्रश्न काही केल्या जात नाही. ह्या असल्या प्लॅन्ड हिंसेची सुरूवात कुठून झाली? काही उत्तर आहे? हिंसा असते हो बाकी प्राण्यांमध्ये, पण ती एक्जिस्टेन्शियल लेवल किंवा सेक्शुअल कॉन्टेक्स्ट मध्ये असते. माकडातून मानव जन्मला तेव्हा नक्की काही म्युटेशन झालं असणार. आपण संज्ञानात्मक क्रिया जरूर मिळवल्यात, पण सारासार विवेक गमावून बसलो. तुम्ही-आम्ही करतो हो युद्धाचे ग्लोरिफिकेशन. काय नॅशनॅलिजम चा ज्वर संचारतो जेव्हा काश्मिर चर्चा सुरू होते. पण त्या सर्व संघर्षाचे काय परिणाम होतात तिथल्या स्थानीय जीवनावर, याचं काय हो आपल्याला? हिंसा कधीही स्थायी सामाजिक आणि राजनैतिक नीति बनू शकत नाही.
शांतिवाद प्रशंसात्मक नव्हे, उपहासात्मक शब्द झालाय. नॅशनॅलिजम आणि पॅट्रियॉटिजम वर चर्चा चालू असताना गांधी, नेल्सन मंडेला, दलाई लामा ही नावं घेऊन बघा. चीरफाड होईल तुमची. मला या नेत्यांबद्दल प्रचंड आदर आहे. यांच्याविरुद्ध कोणी काही म्हणालं तर लाही-लाही होते. आणि मग नको ते शब्द निघून जातात. अहिंसेचा असा हिंसात्मक प्रचार नकोसा वाटतो. आणि हे फ्रस्ट्रेशन वर येतंच की आपण ऑड-मॅन-आउट आहोत. मग सगळं काही नको वाटतं. काश्मिर वादाबद्दल जेव्हा सगळे समरसतेने बोलत असतात, मला उठून जायचा मोह होतो.
मी शांतताप्रेमी आहे. हिंसा, द्वेष, क्रौर्य, प्रदेशवाद, राष्ट्रवाद सगळं काही मुळासकट उपटून फेकून द्यायला हवीत असं माझं मत आहे. त्याऐवजी प्रेम, समन्वय, सामंजस्य प्रस्थापित होण्याची गरज वाटते. हा रक्तपात, हे क्रौर्य किती अपराधी आणि हानिकारक आहे असंही वाटतं.
पण कधीकधी अचानक हुरूप येतो. परिस्थिती इतकी वाईट नाही असं वाटतं. बलाढ्य देशांच्या तुलनेत आपला देश नेहमीच फेअर स्टॅंड घेत आलाय. अहिंसा आणि शांतिप्रियता म्हणजे कमजोरी नव्हे हे आपल्याला कळते. हिंसा हा मध्यममार्ग होऊ शकत नाही हे पण आपल्याला समजते. आपण स्वयंभू आहोत, आपण स्वातंत्र्य मिळवलंय, अणूशक्ती मिळवलीय, सी. टी. बी. टी. वर सही केली नाही हे आठवून दिलासा वाटतो. वी कॅन टीच अ फ्यू लेसन्स टू द डेवलप्ड वर्ल्ड!

Saturday, April 15, 2006
A Tattered Tale of Random Happenings
माझं दहावीपर्यंतचं शिक्षण मराठीत झालंय. इंग्लिश आत्ता-आत्तापर्यंत परकी वाटायची. विचार मराठीत आणि बोलणे इंग्लिश मध्ये चालायचे. 'debut' मधला टी सायलेंट असतो, 'gorgeous' मधला पहिला g 'ग' असा आणि दुसरा g 'ज' असा प्रोनाउन्स करायचा असतो, ही अक्कल फार नंतर आली. आणि incidence-incident मधला घोटाळा अजुनही काही केल्या जात नाही.
'Frayed' हा शब्दही असाच. पहिल्यांदा ऐकल्यावर आधी डिक्शनरी उघडून अर्थ बघितला. पुन्हा ऐकायला मिळेल असं वाटलं नव्हतं. But as usual, I was wrong.
I don't feel lonely atall. Crises and controversies never leave me alone. मी माझ्या एका जिवलग मित्राला आणि त्याच्या प्रोजेक्ट ला frayed म्हणालो असा कोणाचा तरी दावा! Like Dori, I too suffer from short term memory losses. पण जो शब्दच नीट कळलेला नाही, तो बोलण्यात कसा आणि कुठे वापरायचा? People perceive me as an expert in giving quotable quotes at the drop of a hat. But do allow me to say, माझ्या इंग्लिश भाषेत फ्रेड सारखे high-falutin' शब्द नाहीत.
You got a grudge against someone? Fine. But please don't use my shoulders to fire the gun.

Friday, April 14, 2006
The Willing Victim
रोजच्या जगण्यात धर्मात्मा म्हणून मिरवण्याऱ्या लोकांची मजा असते. पण यातले जवळपास सर्वजण जीवनात काही stand घ्यायला घाबरत असतात. मग charitable soul अशी स्वतःची जाहिरात केली तर बरं फावतं. कारण कोणताही problem head-on tackle करण्यापेक्षा, स्वतःच्या rights साठी झगड्ण्यापेक्षा, दुसऱ्याना सामोरे जाऊन स्वतःची बाजू मांडण्यापेक्षा आपल्या चांगुलपणावर विश्वास ठेवणं कितीतरी सोपं असतं. आपल्यावर केलेले वार हुकवून, प्रत्युत्तर देता येणं, यासाठी हिम्मत लागते. Opposition अधिक dominant असला तर मग विचारायलाच नको; सोपं आहे सगळं काही चूपचाप ऐकून घेणं. असं म्हणणं फार सोपं आहे की या सगळ्यांचा त्रास होत नाही, पण मग रात्री - जेव्हा सगळी सपोर्ट सिस्टम झोपलेली असते - तेव्हा शांतपणे आरामात स्वतःला analyze करून दोन अश्रू गाळणे हा रोजचाच कार्यक्रम होऊन बसतो. आणि exasperating म्हणजे पूर्ण जगासमोर मात्र या प्रोसेस ला मार्टीयरडम म्हणून प्रोजेक्ट केल्या जातं.
Subscribe to:
Posts (Atom)