इकॉलॉजी हा एक असा विषय आहे ज्यात प्रत्येक क्षणी काही ना काही आश्चर्यचकित करणारं मिळत जातं. पहिल्या एका वर्षातील कठीण आणि नियमबद्ध कोर्सवर्क ने उत्साहाचा पूर्ण भंकस केलेला. आताही होतं कधीकधी असं, जेव्हा मनासारखं काही करायला मिळत नाही. पण त्या पहिल्या वर्षातली चिडचिड, अनुत्साह, सेल्फ-पिटी, असंतोष आता मात्र मनाला शिवत नाही. साचेबद्ध रिसर्चचा मात्र धसका घेतलाय. सीनियर ने रिसर्चचा अर्थ जेव्हा 'रि' आणि 'सर्च' असा संधीवियोग करून सांगितला तेव्हा त्याला एक थोबाडीत द्यावी असं वाटलं.
एनीवे, आता आता जाणवायला लागलंय की माझ्यात काही पोटेंशियल आहे. इथलं वातावरण आणि माझा बॉस दोन्ही फॅक्टर्स यासाठी कारणीभूत आहेत.
असं जाणवायला लागलंय की माझ्यात काही शक्ती आणि सामर्थ्य आहे. मला हे टॅप करायचंय. I want to flourish.
Thursday, April 27, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
स्वत:मधल्या 'स्व' चा शोध घेण्याची प्रक्रिया कधीच संपत नाही आणि दरवेळी कुठल्या न कुठल्या टप्प्यावर आपल्यालाच आपली नवी ओळख अशी अचानक सामोरी येते की आपणही नवल करत रहातो.
तुझे पोस्ट्स गेले काही दिवस follow करतेय मी आणि त्यातला स्वत:शी प्रामाणिक रहाण्याचा प्रयत्न आवडला. व्यक्त चांगल करतोस तु आलोक. लिहित रहा.
Post a Comment