Monday, April 17, 2006

In Search of Peace

एका मित्राशी जामा मशिदीत झालेल्या बॉम्ब्स्फोटांबद्दल बोलत होतो. मग बॅंगलोर मधला नुकताच झालेला हिंसाचार, बॉम्बे मध्ये झालेले स्फोट, कारगिलचे युद्ध, चीनचे तिबेट आणि काश्मिर वरचे अतिक्रमण, अमेरिकेचा मिड्ल ईस्ट द्वेष अशा बऱ्यच विषयांमधून भरकटत गाडी आली पाकिस्तान मुद्द्यावर. मग मात्र आतापर्यंत मस्त चाललेल्या डिस्कशन मध्ये माझ्या बाजूने एक वेयरिनेस आला. लवकर या डिस्कशन मधनं डिसकनेक्ट होता येत नाही. आणि आग्रह हा असतो की सर्वांचा सहभाग या डिस्कशन मध्ये असावा. जॉन मेनार्ड स्मिथ च्या 'थियरी ऑफ इवॉल्युशन' ची इतकी पारायणं करूनही एक प्रश्न काही केल्या जात नाही. ह्या असल्या प्लॅन्ड हिंसेची सुरूवात कुठून झाली? काही उत्तर आहे? हिंसा असते हो बाकी प्राण्यांमध्ये, पण ती एक्जिस्टेन्शियल लेवल किंवा सेक्शुअल कॉन्टेक्स्ट मध्ये असते. माकडातून मानव जन्मला तेव्हा नक्की काही म्युटेशन झालं असणार. आपण संज्ञानात्मक क्रिया जरूर मिळवल्यात, पण सारासार विवेक गमावून बसलो. तुम्ही-आम्ही करतो हो युद्धाचे ग्लोरिफिकेशन. काय नॅशनॅलिजम चा ज्वर संचारतो जेव्हा काश्मिर चर्चा सुरू होते. पण त्या सर्व संघर्षाचे काय परिणाम होतात तिथल्या स्थानीय जीवनावर, याचं काय हो आपल्याला? हिंसा कधीही स्थायी सामाजिक आणि राजनैतिक नीति बनू शकत नाही.
शांतिवाद प्रशंसात्मक नव्हे, उपहासात्मक शब्द झालाय. नॅशनॅलिजम आणि पॅट्रियॉटिजम वर चर्चा चालू असताना गांधी, नेल्सन मंडेला, दलाई लामा ही नावं घेऊन बघा. चीरफाड होईल तुमची. मला या नेत्यांबद्दल प्रचंड आदर आहे. यांच्याविरुद्ध कोणी काही म्हणालं तर लाही-लाही होते. आणि मग नको ते शब्द निघून जातात. अहिंसेचा असा हिंसात्मक प्रचार नकोसा वाटतो. आणि हे फ्रस्ट्रेशन वर येतंच की आपण ऑड-मॅन-आउट आहोत. मग सगळं काही नको वाटतं. काश्मिर वादाबद्दल जेव्हा सगळे समरसतेने बोलत असतात, मला उठून जायचा मोह होतो.
मी शांतताप्रेमी आहे. हिंसा, द्वेष, क्रौर्य, प्रदेशवाद, राष्ट्रवाद सगळं काही मुळासकट उपटून फेकून द्यायला हवीत असं माझं मत आहे. त्याऐवजी प्रेम, समन्वय, सामंजस्य प्रस्थापित होण्याची गरज वाटते. हा रक्तपात, हे क्रौर्य किती अपराधी आणि हानिकारक आहे असंही वाटतं.
पण कधीकधी अचानक हुरूप येतो. परिस्थिती इतकी वाईट नाही असं वाटतं. बलाढ्य देशांच्या तुलनेत आपला देश नेहमीच फेअर स्टॅंड घेत आलाय. अहिंसा आणि शांतिप्रियता म्हणजे कमजोरी नव्हे हे आपल्याला कळते. हिंसा हा मध्यममार्ग होऊ शकत नाही हे पण आपल्याला समजते. आपण स्वयंभू आहोत, आपण स्वातंत्र्य मिळवलंय, अणूशक्ती मिळवलीय, सी. टी. बी. टी. वर सही केली नाही हे आठवून दिलासा वाटतो. वी कॅन टीच अ फ्यू लेसन्स टू द डेवलप्ड वर्ल्ड!

No comments: