Tuesday, August 22, 2006
Easy Action
ते दिवस गेलेत जेव्हा वास्तवात जे घडलंय त्यासंबंधात लोक बोलायचेत. मी जे विचित्र केलंय, वागलोय, बोललोय, त्याबद्दलच का होईना पण, जे प्रत्यक्षात होत असे तेच चघळल्या जात असे. आता मात्र सगळं कपोलकल्पित बोलल्या जातं, तेही फक्त सेन्सेशनालाइज करण्याचा एक प्रयत्न असतो. माझ्या सरळ वागण्यामुळे मी एक इजी टारगेट झालोय हे विसरुन चालणार नाही. पण हे फक्त चिडचिडा, अनप्रोफेशनल, नेहमी एकटा आणि रुष्ट असणारा, एवढ्यापुरतं मर्यादित असतं तर ह्या सगळ्या प्रतिक्रियेला फारसं महत्त्व न देता विसरून जाणे शक्य होते, पण जातिवादी, ड्रग-ऍडिक्ट ही आणि असली अनेक भोचक आणि तथ्यहीन विशेषणं ऐकल्यावर 'पुढे काय?' हा प्रश्न मनात येतो. बरं यांना हसण्यावारी न्यावं की मनात आपल्या एक्सट्रा पॉप्युलॅरिटी बद्दल खिन्नता बाळगावी, कळत नाही. आणि, यावर उपाय काय? एकाची जीभ हासडली तर आणखी दहा लसलसत राहणार. परंतु भाग्य बलवत्तर आहे. माझं आत्मबळ इतकं अस्थिर आणि कोमल नाहीय. प्रयत्न केला तर हे सर्व विसरता येणे काही अशक्य नाही. विसरता येणे शक्य नसले तरीही लोकांना हे कळण्याचे काहीच कारण नाही की मला याचा त्रास होतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment