Wednesday, April 26, 2006

जे अस्तित्वात नाहीय, त्याचाच शोध चाललेला असतो. जीवनाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता कळायला लागलंय की गहन प्रश्नांची उत्तरे मिळवणे, इतकाच जीवनाचा अर्थ सीमित नाही. एनीवे, पडलेल्या प्रश्नांची उत्तरं बऱ्याचदा मिळवावी लागत नाहीत, ती आपोआप मिळत जातात. अस्तित्व, जीवन, आयडेन्टिटी, आणि असेच निगडित प्रश्न, यांची उत्तरं काही एका फॉर्म्युल्यात बांधता येणार नाहीत. पण तसंच काही असतं तर मात्र मजा आली असती.

No comments: