Wednesday, May 17, 2006

माझं आणि संतोष, जो माझा बॅचमेट आणि एक फार चांगला मित्र आहे; आमचं बिघडलंय, अशीच काहीतरी फालतू अफवा डिपार्टमेंट मध्ये आज ऐकायला मिळाली. बास, शुद्ध मूर्खपणा आहे!!! आम्ही कालच भेटलो. एकदम बिंदास.

कोर्सवर्क करताना जितका वेळ सोबत घालवायचो, तितका आता शक्यच नाही. आपापल्या प्री-वायवा परीक्षेची तयारी सगळे करताहेत. प्रत्येकाचा टाइम-टेबल प्रचंड टाइट झालाय. या सगळ्यातून वेळ कसा काढणार? संतोष माझा मित्र आहे, आणि आमची मैत्री होती तशीच अजुनही आहे. Not in jeopardy.

No comments: