Thursday, February 05, 2009

इथला माझा एक सहयोगी...त्याला या ४ वर्षात मी कधीही आनंदी बघितला नाही...खदखदणारे हास्य सोडा, महाशयांच्या चेहऱ्यावर समाधानाची एक पुसटशी खूणही कधी दिसली नाही. चेहरा सारखा चिंतेत बुडालेला किंवा रागाने पछाडलेला. बहुतांशी रागच. त्याला बोलतं करण्याच्या प्रयत्नात मी कधीच माघार घेतलीय. कारणांचा काही पत्ता लागत नाही. या अपात्री क्रोध-कुण्डाचा प्रकोप कधी कोणावर होईल सांगता येत नाही. सगळे रागाचे आविष्कार छापखान्यातल्या खिळ्यांसारखे नेमी आणि आवर्तनीय. फ़्रॉइड ने तर नक्की याला केस स्टडी म्हणून स्वीकारला असता. म्हणला असता, "श्रीमान एक्स, तुमच्या या वागण्याचे मूळ जरूर तुमच्या बालपणात आहे. यापैकी एक तुमच्याशी जरूर घडली असण्याची शक्यता आहे:

१. तुमच्या आईने तुमच्याशी फार जास्त शारीरिक लगट तरी केली किंवा तुम्हाला प्रेमाच्या एका शब्दाला तरी पारखं केलं. जे काही असेल, तुम्हाला निर्मळ मातृप्रेम कधी मिळालेच नाही,
२. शाळेत सगळे तुमच्याशी तुसडेपणाने वागायचे,
३. रात्री-अपरात्री सगळे झोपले असताना तुमचा कोणी एक काका तुमचा लैंगिक छळ करायचा."

I'm being unnecessarily nasty.

पण जे काही कारण असेल, इतका त्रास, इतका राग बघणे शक्य नव्हते. Thought everyone deserves happiness. त्याच्याशी मैत्री करण्याचा दांडगा पण अयशस्वी प्रयत्न करून झाला. मित्रांकडून त्याला ग्रूप मध्ये समाविष्ट करण्याचे प्रयत्न झाले. त्याच्या ऍडवायजर शी बोलून त्याला कामाच्या नव्या संधी मिळाव्यात असे पण बोलून झाले. पण कशाचाही काहीही फायदा झाला नाही. कदाचित हे सगळे त्याला नको असेल. कदाचित भार वाहण्याची मनाला इतकी सवय झाली आहे, प्रसन्नचित्त, प्रफुल्ल, हलके मन असणे काय असते हे तो विसरला असेल, त्याची सवय नसल्याने ते हलकेपण डोकेदुखी वाटत असेल.

Maybe not everyone wants to be happy. Maybe, sometimes, happiness hurts.

4 comments:

Anonymous said...

oh dear i cant understand this at all! I will have to get you to translate it for me...
bm

Priya said...

yeh kya matlab.... you write some thing interesting... personal...and in language beyond my grasp....

A said...

@Priya: An effort to keep in touch with Marathi...utter waste of an effort though...All my Maharashtrian attributes slowly atrophying...

A said...

bm, ask me on gtalk! :D You would wanna know!