Thursday, May 11, 2006

The Love Gone Awry

मराठी ब्लॉगिंग ची सुरुवातीची हौस आता संपलीय. आधीसारखं दररोज पोस्ट टाकायचा आता कंटाळा येतो. कुठल्याही रुटीन मधनं स्वतःला सोडवायची धडपड मग सुरु होते. ती फेज येण्याआधीच ठरवलं, लिहावंसं वाटेल, तरच लिहेन.

काल काही नेहमीसारखं झालंच नाही. माझं माझ्या सीनियर वर पूर्ण लॅब समोर ओरडणं, माझ्या सलग दुसऱ्या नेस्टची वाताहत, आमच्या स्टॅटिस्टिशियन कडून हे ऐकून घेणं की साइंटिफिक टेंपरामेंट माझ्यात कसा नाही, वगैरे वगैरे. ह्या सगळ्यातून स्वतःला सोडवता सोडवता संध्याकाळ झाली, आणि मग रेडिफ उघडला तर अजून एक धक्का. एक्स-गर्लफ्रेंड ने मेल केलेला. थॅंक गॉड, मी जंक मेल फ़ोल्डर चेक केला.

विस्तृत तपशीलात न जाता सांगतो...'Never ditch anyone in love A, otherwise their curse will always follow you...' असंच आणखी बरंच काही...

आठवायचा बराच प्रयत्न केला. आमचा ब्रेक-अप झाला तेव्हा आम्ही दोघंही अपरिपक्व होतो. असं काही बोलून वेगळे झालोच नाही. एक दिवस अचानक कम्युनिकेशन संपलं. बोलायला प्रचंड होतं, पण ते स्वतःजवळच ठेवलं.

काहीही असलं तरीही मी तिला कुठेतरी, कसंतरी let-down केलेलं असणार. मी परिपूर्ण नक्कीच नाही. माझे विचार, माझे निर्णय बऱ्याचदा फक्त माझ्या point-of-view नेच बरोबर असतात हे मला माहितीय. मी बऱ्याचदा किती, किती चुकीचं वागलोय, ह्याची नंतर मला जाणीव होते...हे असं तेव्हा होतं जेव्हा मी त्या व्यक्तिऐवजी स्वतःला ठेवून बघतो...पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. माझ्यात अनेक दुर्गुण आहेत. बऱ्याचदा माझं वागणं फार उथळ असतं. इन्टेन्शनली काहीही केलेलं नसतं, पण समोरच्याला माझ्या या असल्या वागण्यामुळे वाईट वाटलेलं असतं...माझी माफी मागण्याची पण तयारी असते. लगेच फोन उचलून तिच्याशी बोलावं असं क्षणभर वाटून गेलं, पण ती कशी react करेल याची खात्री नव्हती. ती सगळं misconstrue करेल असं वाटलं. फोन खाली ठेवला. आणि मग मला असंही वाटायला लागलं, चूक फक्त माझीच आहे असं मी स्वतःला दूषण देण्याचं कारण तरी काय? आम्ही दोघंही ब्रेक-अप साठी कमी-जास्त प्रमाणात सारखेच जबाबदार होतो. मी पण आणि तीही.

2 comments:

Priya said...

Marathi?????? Dude, how are all those non maharashtrians supposed to read...or is tht the trick...u dont wnt them to read?????

Alok said...
This comment has been removed by the author.