Wednesday, May 03, 2006

प्रत्येक रिलेशनशिप एक नवीन अनुभव असतो. मग ते पहिलं प्रेम असो किंवा दहावं, फारसा फरक पडत नाही. जितका जास्त अनुभव तितका बोथटपणा वाढत जातो हे चूक आहे. दर वेळेला नवीन परिस्थिती उद्भवते. प्रत्येक नवं नातं स्वर्ग निर्माण करू शकतं, किंवा आपल्याला नरकाधीन करून चाललं जातं. आणि आपल्या हातात असतं ते फक्त त्याचा स्वीकार करणे. कारण तोपर्यंत प्रेम हे जगण्याचं मूळ उद्देश्यच बनून गेलेलं असतं. ऑन अदर हॅंड, ज्याने प्रेमच केलं नाही, त्याच्या जगण्याला काय जगणं म्हणायचं? प्रेमाचा अस्वीकार केला, तर जिवंत तरी कशासाठी राहायचं? जिथे, जसं प्रेम मिळतं, तिथे, तसाच त्या प्रेमाचा स्वीकार आपण करतो, करावा लागतो. जरी त्यासाठी कित्येक दिवस, महिने, वर्षं हतोत्साही आणि दुःखी मनःस्थितीत घालवावी लागली तरीही.
ज्या क्षणी प्रेमाचा ध्यास घेतला, प्रेम पण आपला ध्यास घेतं.
आणि नव्याने जगायला प्रवृत्त करतं.

1 comment:

Smita said...

Well said!! It brought smile to my lips and enthused me to keep looking for love!